कोरोनाला हरवून 998 रुग्ण घरी परतले
नवीन 1195 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 65015 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1195 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 2032 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 1119 अहवाल प्रलंबित आहेत. 316 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबित 765 मधील 233 पॉझिटिव्ह आले आहेत. 2577 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 646 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78090 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11608 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1467 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 65015 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 998 आहे.