हिंदी अध्यापक संघाच्या विभागीय अध्यक्षपदी प्रा. विश्‍वनाथ मरतुले

हिंदी अध्यापक संघाच्या विभागीय अध्यक्षपदी प्रा. विश्‍वनाथ मरतुले

अहमदपूर (गोविंद काळे) : महेश कनिष्ठ महाविद्यालय शिरूर ताजबंद ता. अहमदपूर जि. लातूर येथे पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले प्रा. विश्वनाथ मन्मथ मरतूले यांची निवड महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ लातूर विभागाच्या अध्यक्षपदी झाली आहे. सदरील निवड ही महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष प्रा. मिलींद कांबळे यांनी केली आहे.
श्री महेश कनिष्ठ महाविद्यालय शिरूर (ता.) येथे प्रा. विश्वनाथ मरतूले हे पाच जुलै एकोणीसे एक्यानवला रूजू झाले असून ते सध्या पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या एकूण तीस वर्षाच्या सेवाकाळात परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, पेपर सेटर, हिंदी अभ्यासक्रम साधन व्यक्ती, वरीष्ठ श्रेणी प्रशिक्षण साधनव्यक्ती म्हणुन त्यांनी यशस्वीपणे कार्य केले आहे. तसेच ते यापूर्वी म.रा. कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ लातूर विभागातून राज्य सहसचिव म्हणून कार्यरत होते.
या निवडीबद्दल लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाल बाहेती, नांदेड- प्रा. दिलीप चौधरी,उस्मानाबाद -प्रा.अरुण करडामे, श्री महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव चंद्रशेखर पाटील, महेश माध्य. व उमावि चे प्राचार्य लिंब राज केसाळे, उपप्राचार्य गंगाधर बिराजदार, गुरुदत्त महाविद्यालय जळकोटचे प्राचार्य दत्तात्रय हम्पल्ले, कुमारस्वामी महाविद्यालय पंढरपूरचे प्राचार्य स्वामी सर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवडीबद्दल प्रा. मरतूले यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!