लसीकरणासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला २५ लाखाचा निधी
पिंपरी-चिंचवड (केशव नवले) : पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शहरातील लसीकरणासाठी 25 लाखाचा निधी आमदार निधीतून दिला. अशाप्रकारे निधी देणारे शहरातील ते पहिले आमदार आहेत. या निधीतून आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात यावी असे पत्र त्यांनी माननीय जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले आहे. शहरात असणाऱ्या लसीकरणाचा तुटवडा त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद पडलेल्या अवस्थेत होती यावर उपाय म्हणून आमदारांनी 25 लाखाचा निधी दिला आहे. मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात आमदारांनी अनेक गोरगरिबांना मोफत किराणा वाटप केले होते. मागील महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील वाय सी एम हॉस्पिटल साठी सिटीस्कॅन मशीन बसविण्यात आली त्यासाठी अण्णा बनसोडेनी आमदार निधीतून सव्वा कोटी रुपये दिले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांना एच आर सिटी स्कोअर मोफत कळणार आहे. यासाठी पूर्वी बाराशे ते पाच हजार रुपये घेतले जात होते.