खाकी वर्दीतील देवमाणूस……. सचिन उस्तूर्गे
“खरोखरच पोलीस वर्दीतील देवमाणूसच,ना पदाचा कोणता बडेजाव ना कोणती पुशारखी,आगदी सध्या माणसाप्रमाणे नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढणे हे साहेबांची खासियत“
औसा (प्रतिनिधी) : समाजामध्ये पोलीस या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन जरा वाईटच असतो,कारण पोलीस म्हणजे पैसे घेणारा, पोलीस म्हणजे उद्धट बोलणारा, पोलीस म्हणजे पोलीसी खाक्या दाखवणारा अशी अनेक नावे जनतेने पोलिसांना देऊन ठेवलीत,परंतु किल्लारी पोलीस ठाण्यात सचिन उस्तूर्गे हा देवमाणूस गेल्या दोन वर्षांपूर्वी लामजना बिट जमादार म्हणून रुजू झाले,व किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांच्या माध्यमातून गावागावांत शांतता,अवैध धंद्याला वचक बसवण्याचे आणि सर्वसामान्य लोकांना शिस्तीचे पालन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
किल्लारी पोलीस ठाण्या अंतर्गत लामजना बिट जमादार सचिन उस्तूर्गे यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम करून गरजुंच्या मदतीपासून पोलिसांच्या सुरक्षेला पण त्यांनी प्राधान्य दिले.
कोरोनाच्या काळात किल्लारी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांत शांतता, संयम राखून ठेवण्यासाठी गावातली शेतकऱ्यांची भांडणे थेट बांधावर जाऊन मिटवण्यासाठी उस्तूर्गे साहेबांनी प्रयत्न केले आहेत.
औसा तालुक्यातील लामजना परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतच जात आहे, अशा रेड झोन क्षेत्रात उस्तूर्गे साहेबांनी आपल्या माध्यमातून चांगल्या सर्वसामान्यांना कोणताही त्रास न देता त्यांची अडचण सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करता या साठी प्रयत्न केले आहेत. लामजना येथे किल्लारी पोलिसांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले त्या कामी साहेबांचा मोलाचा वाटा आहे.
निवडणूक असो की एखादा बंदोबस्त प्रत्येक वेळी साहेबानी पुर्ण ताकतीने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे.