1249 रुग्णांनी केली कोरोना वर मात

1249 रुग्णांनी केली कोरोना वर मात

नवीन 592 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 70600 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 592 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 528 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 220 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 2357 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 372 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 82239 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10036 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1603 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 70600 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1249 आहे.

About The Author