कानेगाव ग्रामस्थांना सँनिटायझरचे मोफत वाटप

कानेगाव ग्रामस्थांना सँनिटायझरचे मोफत वाटप

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील कानेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषद कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे यांच्या हस्ते ग्रामस्थांना मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच ब्रह्मानंद शिवनगे, ग्रामसेवक एस.बी.शिरुरे.तुकाराम लांडगे,आशा कार्यकर्ते सौ.कविता मोटाडे.सौ रेखा सुरवसे. ग्रा.पं. कर्मचारी गोपाळ सोलंकर उपस्थित होते कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पहाता त्यांचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी कानेगाव ग्रामपंचायत विविध उपाय योजना राबवित असून गावात जंतुनाशक फवारणीनंतर खबरदारीच्या उपाय म्हणून ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप केले आहे कोरोना अजून संपलेला नसून घरी रहा सुरक्षित राहा, हँडसँनिटायझर चा वापर करा, मास्क चा वापर करा.काम आसेल तरच बाहेर पडा,योग्य ती काळजी घूया आसे आवाहन सभापती गोविंदराव चिलकुरे यांनी ग्रामस्थांना केली आहे.

About The Author

error: Content is protected !!