आॅक्सीजन देऊन निलमताई गोऱ्हे यांनी केली उदगीरकरांच्या उपकाराची परतफेड
आॅक्सिजन काँन्सेट्रेटर्स साठी १० लाखाची मदत
उदगीर (प्रतिनिधी) : कोरोनाने माणसांना चांगलेच घेरले असून आॅक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या 35 वर्षा पुर्वी उदगीरकरांनी मला भरपूर दिले आहे. याचीच दखल घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून उदगीर येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयासाठी आॅक्सिजन काॅन्सेट्रेटर्स करिता 10 लाखाचा निधी उदगीरकरांनी दिलेल्या प्रेमाची उतराई केली आहे.
निलमताई गोऱ्हे यांची उदगीर मधील चार वर्षाची कारकीर्द ही युक्रांदच्या माध्यमातून उदगीरकरांची चौबारा रोड वरती रूग्णालयाच्या माध्यमातून सेवा घडली,आणि त्या निमित्त चार वर्षे त्या उदगीर व परिसरात जनतेच्या सेवेत घालवलेल्या आहेत. याच वेळी उदगीरच्या जनतेनेही भरभरून प्रेम केले आहे. ती आठवण गोऱ्हेताईंनी विसरलेल्या नाहीत.हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माथ्यमातुन उदगीरचे रहीवाशी व विधीमंडळ व मंत्रालयात स्वियसहायक म्हणुन कार्यरत असलेले राजकुमार मोगले व शिवसेनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी उदगीरच्या शासकीय रूग्णालयात अत्यंत गरजेचे असलेले आॅक्सिजन कान्सेट्रेटर्स व रेमडेसीवीर उपलब्दतेसाठी १० लक्ष उपलब्ध करावेत या साठीची मागणी केली. उदगीरच्या सामान्य रूग्णालयात सामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावित अशी मागणी करून उदगीरची परिस्थिती मुख्यमंत्री महोदयां पर्यंत पोहचवुन या महामारीवर मात करण्या करीता क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उदगीरकरांसाठी हा निधी उपलब्ध करूण दिला. त्या बद्यल विधान परिषदेच्या उपसभापती यांचे विधानसभा संपर्कप्रमुख अॅड. क्षीरसागर,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आदावळे,श्रीमंत सोनाळे,विलास अण्णा बिरादार,अरुण बिरादार,तानाजी वडले,अॅड काकडे,कुलदीप पाटील,मनोज पाटील, सचिन पाटील,भानुदास कबनुरे,किरण मुळे,सखाराम गुराळ,प्रशांत पाटील,रमण माने,प्रदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.