“रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” ;पाच तरुणांचा समाजासमोर आदर्श घेणारा उपक्रम

"रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" ;पाच तरुणांचा समाजासमोर आदर्श घेणारा उपक्रम

अहमदपूर शहरातील पाच तरूण ठरत आहेत कोरोना रूग्णांसाठी अन्नदुत

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरातील कोवीड हॉस्पीटल विविध इतर रूग्णालये, शासकीय रूग्णालय मधील कोरोना रूग्णांना व नातेवाईकांना विनामुल्य जेवणाचे डब्बे वाटप कार्यक्रम गेल्या तीन आठवड्यापासून चालू असुन हा उपक्रम रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी एक आधार बनला आहे शहरातील पाच तरुण एकत्र येऊन. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने रुग्णांना व नातेवाईकांना कोवीड हॉस्पीटल सह इतर हॉस्पीटलमध्ये डब्बे पोच करत आहेत.

         याविषयी सविस्तर माहीती अशी की, सध्या महाराष्ट्रात तसेच लातुर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन त्यातच प्रशासनाने लॉक डाऊन केले असल्यामुळे अहमदपूर शहरातील चार कोवीड हॉस्पीटल तसेच इतर हॉस्पीटल, शासकीय ग्रामीण रुग्णालया मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या कोरोना रूग्णांचे व नातेवाईकांचे हॉटेल सेवा बंद असल्यामुळे जेवण्याच्या डब्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी  वणवण फिरावे लागत आहे  

कोरोना सारख्या महामारी मध्ये कित्येक जणांच्या घरचे पॉझिटिव्ह आले असल्यामुळे तेथे आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. हे चित्रण वारंवार शहरात दिसून येऊ लागले असल्यामुळे याला कुठेतरी आळा बसावा म्हणून शहरातील विलास शेटे, शंकर मुळे,नयुम शेख, गोपीनाथ जायभाये, माधव भदाडे या पाच युवकांनी “रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा ” हे ब्रिद वाक्य घेऊन या उपक्रमाला सुरुवात केली.
पाहता पाहता त्यांनी दिवसाला ६० डब्यावरून १५० जेवणाचे डबे रोज सकाळी १२ : ०० वाजता आणी संध्याकाळी ०८ : ०० वाजता शहरातील पाटील हॉस्पीटल, बिराजदार हॉस्पीटल, कदम हॉस्पीटल, विठाई हॉस्पीटल, शासकीय ग्रामीण रूग्णालय इतर रूग्णालये रस्त्यावर फिरणारे मनोरूग्ण व ग्रह विलिगीकरणात असलेल्या रूग्णांना देखिल जेवणाचे (वरण,भात,भाजी,चपाती, खीर,सलाद, शेंगदाने )डब्बे घरपोच विनामुल्य वाटप करू लागले आहेत. ही सेवा २६ एप्रिल पासुन चालु केली असुन १५ मे पर्यत चालु राहणार आहे आजपर्यत जवळपास दोन हजार डब्यांचे वाटप केले आहे तसेच सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस, नगरपालिका कर्मचारी अधिकारी यांना चहा व बिस्किटचे वाटप देखील करण्यात येत आहे आणी प्रशासनाने जर यापुढेही लॉक डाऊन जाहीर केला तर सदरील सेवा निरंतर चालु राहील त्यांना त्यांच्या मित्र परिवाराचे भरपूर मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यामध्ये काही व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली आहे. आपल्या पॉकेटमनी तील पैसे वाचून आज तरुण समाजासाठी काहीतरी करत आहेत . याचे चित्र अहमदपूर शहरातील तरुणांनी समाजासमोर उभे केले आहे.

About The Author