MH 25 Helping Hands ठरत आहे कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत

MH 25 Helping Hands ठरत आहे कोरोनाग्रस्तांसाठी देवदूत

उस्मानाबाद (प्रशांत नेटके) : कोरोना सारख्या गंभीर आजाराच्या काळात  सामाजिक दायित्व म्हणुन MH25 Helping Hands social group अर्थात तालुका कळंब/जिल्हा ऊस्मानाबाद येथील युवक Facebook, whatsapp या social media  समूहाच्या माध्यमातून अनेक कोरोनाग्रस्तांच्या व गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या कुटूंबाच्या परिवाराला दवाखाना ,दवाखान्यातील खाटाची स्थिती ,औषधांच्या बाबतीत माहिती , मोफत जेवन , रुग्णवाहिका  सेवा यां सारख्या मदती या समूहातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केल्या जात आहेत.

या ग्रुप ची मदत अगदी लातुर, बीड, ऊमरगा, भुम, कळंब, ऊस्मानाबाद व असंख्य गावात पोहोचत  आहे व ग्रामीण असो वा शहरी भागातील रुग्णांना याचा फायदा होत गेलीआहे.

दररोज किमान अंदाजे 30-40 कोरोनाग्रस्तांची व त्यांच्या परिवाराची मदत या ग्रुप कडुन होत आहे.

कोरोना काळात रक्तदानाचीही कमतरता महाराष्ट्रात जाणवत आहे व प्लाझ्मा दाते ही या काळात देवदूत ठरत आहेत, या समूहातर्फे रक्तदान, प्लाझ्मादान ही भरपुर प्रमाणात केला जात आहे . कोरोनाग्रस्त रूग्णांचे नातेवाईकही प्लाझ्मा, व्हेंटिलेटर , ऑक्सिजन बेड, रेमडिसिव्हिरसाठी हि सर्वप्रथम MH25 helping hands कडे मोठ्या आपेक्षेने मागणी करत आहेत व त्यांना ती मदत मिळवुन देण्यासाठी हा समुह दिवस-रात्र राबत आहे.

मागील काही दिवसांपासून या समुहाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

कळंब व उस्मानाबाद मधील या युवकांचे करावे तेवढे  कौतुक कमी आहे.

1) जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांना कोरोनाबात समस्या असल्यास समस्येचे निवारण करण्यासाठी शासन व समाजबांधव यांच्यातील दुवा म्हणून ह्या समूहातील सदस्य काम करत आहेत.

2) ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देणे

3) ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध होईल व कसा होईल या बाबत माहिती देणे,

4) शासकीय विभाग व हॉस्पिटल यांचा संपर्क मिळवून देणे,

5) जिल्ह्यातील कोणत्याही भागात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेणे.

6) एकमेकांची शक्य होईल तितकी मदत करणे.

7) नातेवाईक व कोरोना रुग्ण यांच मनोधैर्य वाढवणे “

                      
Team MH25 Helping Hands

   संपर्क

*उस्मानाबाद*

1)मयुर काकडे
+919673554491
2)संकेत हरवले +918788249203

*कळंब*

1)कुलदिप गायकवाड 9096601235
2) सुमित बलदोटा
+919850556062
3) शुभम राखुंडे
– 8788810446

*वाशी*

1) पंकज चव्हाण –
8208429339
2) आशिष पाटिल
+919422924821

*उमरगा/लोहारा*
1) शुभम देशमुख
7387790654

2) किरण चिंचोले लोहारा
+919146151573

3) अमोल कदम
9922544194

Plazma donate team संपर्क

1) संकेत हरवले +918788249203 ( उस्मानाबाद)

2) विपुल देशमुख
7028034250 (कळंब)

3) यश सुराना
8806869143 (कळंब)

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!