मनभा येथे लसीकरणासाठी जनजागृती
सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा भेलोंडे यांनी घेतला पुढाकार
वाशिम (प्रतिनिधी) : कारंजा तालुक्यातील मनभा येथील सामाजिक कार्यकर्त्या गेल्या काही महिन्यापासून कोरोना काळात कुठलेही मानधन न घेता सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा भेलोंडे ह्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मनभा येथे अविरत सेवा देत आहेत.
तसेच आरोग्य केंद्रात सेवा देत असताना गावात ग्रामस्थांमध्ये प्रबोधन, जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रतिभा भेलोंडे घरोघरी जाऊन जनजागृती करत लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करीत आहेत.सध्या सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधक लस संदर्भात अनेक गैरसमज पसरविण्याऱ्या पोस्ट येत असतात.यातून ग्रामीण भागातील गरीब जनता अगोदरच धास्तावलेली असून त्यांच्या मनातील भीती काढून त्यांना योग्य रित्या लसीकरणाचे फायदे सांगून प्रत्येक नागरीकाना त्यांनी आपले कुटुंब,आपली जबाबदारी म्हणून लसीकरण करून घ्या,नेहमी सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर पाळा, मास्कचा वापर करावा.आपल्याला देशाला कोरोना मुक्त करायचा असून वेळोवेळी शासन व प्रशासनाकडून दिलेल्या नियमाचे पालन करावे असे आवाहन सुद्धा त्या करत आहेत.भेलोंडे घरोघरी जाऊन नागरिकांना लसीकरणासाठी तयार करत असून त्या लसीकरण केलेल्या नागरिकांची आपुलकीने विचारपूस करत त्यांना दुसरा डोज सुद्धा घेण्यास सांगत आहेत.लसीकरण केलेल्या नागरिकानी सुद्धा त्यांचे अनुभव सांगितले, त्यामुळे लोकांच्या गैरसमज व भीती दूर झाल्याबाबत नागरीकांनी मत व्यक्त केले. त्यांना नागरिकांतून चांगला प्रतीसाद मिळत आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रशासनाने सत्कार करायला हवा.