राष्ट्रवादी महिला काँग्रेसची गांधीगिरी, गॅस सिलेंडर आणि दुचाकी चे श्राद्ध!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची गांधीगिरी, गॅस सिलेंडर आणि दुचाकी चे श्राद्ध!!

पुणे (रफिक शेख) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महागाई चा निषेध नोंदवण्यासाठी गांधीगिरी करत दुचाकी आणि गॅस सिलेंडरचे वर्षश्राद्ध करण्यात आले. एका बाजूला संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संसर्ग टाळण्यासाठी लढा देत आहे. त्यात केंद्र सरकार जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या इंधन दरवाढ इकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. महिलांना तर जगणे कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे गृहिणींच्या आर्थिक नियोजनाचे गणितच पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पंतप्रधानाच्या महालावर हजारो कोटी खर्च करण्यावर हे सरकार मशगुल आहे. जनतेच्या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केला आहे. सरकारच्या या धोरणाचा आणि महागाईचा निषेध अनोख्या पद्धतीने करत चक्क दुचाकी आणि गॅस सिलेंडरचे श्राद्ध करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशात कोरोना संसर्गाचे नैसर्गिक संकट आलेले असताना केंद्र सरकारने महागाईचे सुलतानी संकट जनतेवर लागले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान मोठी मोठी आश्वासने देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला एकही आश्वासनाची पुर्तता करता आलेली नाही. सर्वच आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. पेट्रोल- डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की, जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागले आहे. त्यामुळे आता राज्यभर आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्याचा निर्णयही त्यांनी बोलून दाखवला.

 पुणे शहरात संपन्न झालेल्या या निषेध आंदोलनात प्रशांत जगताप, दिपाली धुमाळ, दिलीप बराटे, मृणालिनी वाणी, सचिन दोडके, महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार, श्वेता होनराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कोरोना च्या अनुषंगाने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना पाळून आंदोलन यशस्वी केले.

About The Author