दिवसभरात 1007 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

दिवसभरात 1007 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 622 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 72629 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 622 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1575 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 307 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 1976 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 204 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 83421 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9126 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1666 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 72629 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1007 आहे.

About The Author