अहमदपूर येथे कोरोना रुग्णांसाठी डॉ.पांडुरंग श्रीराम कदम हे ठरत आहेत देवदूत

अहमदपूर येथे कोरोना रुग्णांसाठी डॉ.पांडुरंग श्रीराम कदम हे ठरत आहेत देवदूत

अहमदपूर [ गोविंद काळे ] : अहमदपूर या शहरांत 22 एप्रिल पासून डॉ. कदम यांचे कोरोना हॉस्पिटल सुरुवात करण्यात आले असुन येथे रुग्णांचे योग्य निदान, योग्य औषधोपचार आणि कमीत कमी पैशांमध्ये रुग्ण बरे व ठणठणीत होऊन घरी सुखरूप आहेत. रेमडेसिविर शिवाय स्टेरॉईड या स्वस्तातल्या इंजेक्शन चा वापर करून शुगर च्या अनेक रुग्णांना ज्यांचे सिटी स्कोर 24 असतानाही जीवदान मिळवून दिल्यामुळे डॉ.पांडुरंग कदम हे रुग्णांसाठी खरे देवदूत ठरत असल्याचे या वेळी रुग्णांनी सांगितले. विशेष म्हणजे येथे आज पर्यंत एकही कोरोना रुग्ण येथे दगावला नसल्याचे डॉ. पांडुरंग कदम यांनी सांगितले.
या तालुक्यातील मुस्तफा जागीरदार यांचे सिटी स्कोर 24 व शरीरातील साखरेचे प्रमाण 350 असताना ही यांना बरे करण्याचे काम याबरोबरच ललिता फुलम़ंटे, पदमीनबाई वाढवणकर, चंपाबाई गुरुडे ,माधव दावणगावे ,सुनंदा हाके या सर्वांचे स्कोर हे 12 ते 20 च्या दरम्यान होते.यातील रुग्ण मधुमेहाने ग्रासलेले होते, अनेकांचे ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी झाले होते .या रुग्णांची अवस्था खूप बिकट होती. या सर्वांवर योग्य निदान व योग्य औषधोपचार करण्यात आल्यामुळे सर्वांना जीवनदान मिळविण्यात डॉ. कदम यांना यश आले आहे या बरोबरच गोविंद पीराजी सुरनर वय 45 हा मधुमेहाचा रुग्ण यांनी यापूर्वी दोन डॉक्टरांकडे उपचार घेऊन क्रिटिकल अवस्थेत असताना डॉक्टर कदम यांच्याकडे दाखल झाला असता यालाही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे यशस्वी काम करण्यात आले असून आता तो सुखरूप आहे.अनेक रुग्ण लातुर हुन उपचारासाठी अहमदपूरला येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले .
डॉ. कदम यांनी सांगितले की रेमडेसिविर इंजेक्शनची सर्व रुग्णांना आवश्यकता नाही हे रुग्णांचे जीव वाचविणारे औषध नाही हे जागतिक संघटनेचे मत असल्याचे सांगून हे इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यु दरात कुठलाही फरक पडणार नाही रुग्ण वाचविण्यासाठी हे प्रभावी औषध नसल्याचे सांगून अनेक रुग्णांना या इंजेक्शन व्यतिरिक्त स्वस्तातले व चांगले आणि प्रभावी स्टेरॉईड हे रुग्णांचे जीवन वाचविणारे औषध असल्याचे सांगून हे औषध दुधारी तलवारी प्रमाणे काम करीत असून याचा वापर किती प्रमाणात, किती दिवस करायचा हे रुग्णांच्या परिस्थितीनुसार त्याचे वय आणि इतर आजार पाहून केला पाहिजे अन्यथा त्याचे विपरीत परिणाम रुग्णांना भोगावे लागतात असे सांगितले.
या रुग्णालयात आलेले अनेक रुग्ण हे गंभीर स्वरूपाचे व मधुमेहाने ग्रासलेले होते.सिटी स्कोर 10 ते 20 पर्यंत आहेत. यातील काही उपचार घेत असून अशांना गरजेनुसार ऑक्सिजन देऊन तर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्के पेक्षा कमी झालेले आहे अशा रुग्णांना NIV या मशीनचा वापर करून रुग्णांना दुरुस्त करण्यात येत आहे आजपर्यंत अनेक रुग्ण गंभीर, अत्यवस्थ स्वरूपाचे आले असताना त्यांना योग्य उपचार करून मृत्यूच्या दाढेतून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम केल्याचे अनेक रुग्णांसह डॉक्टर कदम यांनी सांगितले.
कोरोना रुग्ण दवाखान्यातून दुरुस्त होऊन घरी आल्यानंतर हा आजार येथेच संपत नाही. या रुग्णांना पोस्ट कोव्हिड ची शक्यता असून अशा वेळी योग्य निदान व आवश्यकतेनुसार उपचार करणे आवश्यक आहे.अशा रुग्णांमध्ये तीव्र ,मध्यम व लांब पल्ल्याचे लक्षणे असू शकतात. यात अशक्तपणा, चव न लागणे, पुन्हा ताप येणे, हृदयाचे ठोके वाढणे, चक्कर येणे आणि यात महत्वाचे म्हणजे मधुमेह रूग्णांनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे आहे.अशा प्रसंगी म्युकर मायकाॅसिस नावाचा बुरशीजन्य आजार हा अत्यंत घातक प्रकारचा होत असल्याचे सांगून याची लक्षणे डोळ्याखाली,नाकाच्या आतून किंवा बाहेरून सूज येणे, हिरड्यातून पू येणे, दात गळणे आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉक्टर पांडुरंग कदम यांनी केले.
येथील डॉ. पांडुरंग कदम यांना डॉ. नागेन्द्र येलमटे, डॉ. वैभव रेड्डी ,डॉ.बालाजी साळुंखे, डॉ. शहापूरकर ही डॉक्टरांची टीम उपचारांमध्ये चांगले सहकार्य करीत आहेत

About The Author