कै.मोहनराव पाटील आयुर्वेद रूग्णालय कोरोना रूग्णासाठी ठरत आहे जिवनदायीनी
अहमदपूर( गोविंद काळे ) : मतदारसंघात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेड कमी पडायला लागल्या . त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होऊ नये म्हणून व त्यांना मोठा आर्थिक फटका बसु नये म्हणून मोफत उपचारासाठी शिरूर ताजबंद येथे ३ मे रोजी ऑक्सिजनयुक्त कै. मोहनराव पाटील कोविड सेंटर चालू केले.
या कोविड केअर सेंटरने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे . ३ मे ते ९ मे या कालावधित शिरूर ताजबंद येथील कोरोना कोविड सेंटर येथे सलगरा , गंगाहिप्परगा , आंबेगाव , चिखली , परचंडा , मोहगाव , मोळवण गावच्या १४ कोरोना संसर्ग व्यक्तीवर यशस्वी उपचार करण्यात आले. एचआरसीटी स्कोअर दहा पेक्षा अधिक असलेले चार रूग्ण येथे दाखल झाले आहेत. या कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णांना सकस आहार, फळे देवून त्यांची काळजी येथील डॉक्टर्स घेत आहेत. शिरूर ताजबंद येथे धन्वंतरी आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य दत्ता पाटील, वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अमृत चिवडे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. वैद्यकीय अधिकारी अनुराग कासनाळे, सतीश उगले, राम येलमटे , सोनल सांगवीकर, रोहिणी कांबळे यांच्यासह जयश्री पडिले , रेखा बाबलसदे, आशा मुंडे, महेश पांचाळ, अप्पाराव कंदे, ऋषिकेश कंदे, परमेश्वर सूर्यवंशी, सोनू कांबळे, मुस्तफा पठाण, किशोर वाहुळे आदी आरोग्य सेवा देत आहेत.