नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा – आमदार बाबासाहेबजी पाटील
फोनद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन…!!
अहमदपूर ( गोविंद काळे ) : चाकुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रामीण व शहरी भागात शासनातर्फे नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत गावोगावच्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन दूरध्वनीद्वारे/फोनद्वारे पणन महासंघाचे चेअरमन तथा अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी केले आहे.
यावेळी बोलताना आमदार साहेब म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. रूग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, रेमडेसिवीर इंजेक्शन औषधे याचा तुटवडा संपूर्ण देशभरात आहे. राज्यही त्याला अपवाद नाही. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडी चे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिका-यांच्या संपर्कात राहून लोकांना मदत मिळवून द्यावी. गावोगावी जाऊन लसीकरणासाठी लोकांची नोंदणी करून लसीकरण केंद्रावर त्यांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन आमदार बाबासाहेबजी पाटील केले.