कोविड आजाराचा म.फुले आरोग्यदायी योजनेत समावेश – डॉ.नरसिंग भिकाणे
औरंगाबाद खंडपीठाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्रात 85 टक्के असलेल्या गोरगरिबां साठी शासन दरवर्षी प्रत्येकी दीड लाखाचा विमा काढते व त्यांच्यासाठी महात्मा फुले आरोग्य योजनेचे कव्हर देते ज्यातून त्यांना अनेक आजारांचा मोफत इलाज होतो.यातच आता कोविड या आजाराचा उपचार या आरोग्ययोजने अंतर्गत सामील करून औरंगाबाद खडपीठाणे या योजनेचे अध्यक्ष त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना बनवून गरजूंनी त्यांच्या नावे सविस्तर अर्ज करून या योजनेचा लाभ सर्वच कार्ड धारकांना उचलण्यास सांगितले आहे.दिनांक 5 मे चा हा निर्णय मुंबई हाय कोर्टाचे औरंगाबाद खंडपीठाणे pil No 49/2020 order dated 7/5/2021 घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना आदेश म्हणून पाठवला आहे.या अंतर्गत ज्या रुग्णालयात आरोग्यदायी योजना लागू असूनही रुग्णांकडून कोविड चे बिल घेण्यात येत आहे त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या कडे रुग्णांना रीतसर अर्ज लिहून त्याला केशरी,पिवळी शिधापत्रिका,हॉस्पिटल बिल व आधार कार्ड जोडायचे आहे.तद्नंतर जिल्हाधिकारी संबंधित रुग्णालयाकडून ती रक्कम रुग्णाला मिळवून देतील.या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी केले आहे व हीच मागणी आम्ही शासन दरबारी एक मे रोजी केली होती असे सांगत जिथे म.फुले आरोग्यदायी योजना लागू नाही त्या रुग्णालयाचे कोविड रुग्णांचे हॉस्पिटल बिल जिल्हाधिकारी यांनी भरून शासनाने काढलेल्या विम्याचा या संकट काळात योग्य विनियोग करावा अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.