जिल्ह्यात लसीकरणासाठी जास्तीची लस उपलब्ध करून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण चालू करा..!
सम्राट मित्रमंडळाची शासनाकडे मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पून्हा एकदा 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू करावे आणी जिल्ह्यात लसीकरण अधीक प्रभावी करण्यासाठी जास्तीची लस उपलब्ध आहेत करून घ्यावी अशी आग्रही मागणी येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सम्राट मित्रमंडळाच्या वतीने दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,केंद्राच्या निर्देशानूसार वय वर्ष 18 ते 45 या वयोगटातील नागरीकांना कोव्हीड 19 लसिकरणास परवानगी दिलेली आहे.मागे कांही दिवस हे लसीकरण झाले मात्र आता या वयोगटासाठी लस देण्याचे बंद केले आहे.हा शासनाचा निर्णय तूघलकी स्वरूपाचा आहे.त्या मूळे या वयोगटातील असंख्य नागरिकांचा हिरमोड झाला आहे. त्या मूळे कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या आधी 17 ते 45 या वयोगटासाठी तातडीने लसीकरण करण्यात यावे.
तसेच जिल्ह्यात प्रत्येक लसीकरण केंद्रावर जास्तीच्या लसींची आवश्यकता असून जनतेत लसिकरणा बाबत जागरूकता निर्माण झाली आहे. लस घेण्यासाठी नागरिक पूढे येत असताना प्रशासनाने लस उपलब्ध करणे गरजेचे आहे.
या दोन्ही विषय अतिशय महत्वाचे असून तातडीने या बाबतीत सकारात्मक कार्यवाही करावी असे ही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य,जिल्हाशल्य चिकित्सक लातूर,वैद्यकीय अधीक्षक,अहमदपूर यांना देण्यात आल्या आहेत.