सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिब व गरजुंना अन्नधान्याच्या किटचे वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर मतदारसंघांचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे सुपूत्र, सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील यांच्या १४ मे च्या वाढदिवसाच्या पूर्वसंधेला शिरूर ताजबंद येथील महादेव मंदीरात गोरगरीब व गरजूवंताना अन्नधान्याच्या किटचे वाटप आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
देशासह महाराष्ट्र व लातुर जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असुन त्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे रुग्णालया मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या कोरोना रूग्णांचे व नातेवाईकांचे व गरजूवंताना डब्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून सुरज पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्याच्या किटचे वाटप केल्यामुळे मतदार संघात एक आदर्श निर्माण झाला आहे.
या वाटप केलेल्या १०१ किट मध्ये प्रत्येकी तूरदाळ, मुगदाळ, चहा पावडर, साखर, काजू, बदाम, मसाला, मीठपुडा, मनुके, खारीक, साखर, तांदुळ, तेल इत्यादी साहित्याचा समावेश होता. सदरील किटचे वाटप करतेवेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, कोरोना सोबतची ही लढाई सर्वांनी घरी राहूनच लढायची आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. मास्कचा वापर नियमीत करा. सतत हात धुवा व सॅनिटाईज करा. व तसेच सर्वाना लस घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील, श्राग्वी सुरज पाटील, शिवाअप्पा स्वामी, इलियास सय्यद, कपील स्वामी, राहुल तेलघाने, सलीम शेख, विरेंद्र पवार, लक्ष्मण यलमटे, अविनाश गरडे आदी उपस्थित होते. तसेच यावेळी सोशल डिस्टंन्स चे सर्व नियम पाळण्यात आले.