खा.सुधाकर श्रृंगारे यांनी आरोग्यविषयक सुविधांचा घेतला आढावा!

खा.सुधाकर श्रृंगारे यांनी आरोग्यविषयक सुविधांचा घेतला आढावा!

रेणापूर (प्रतिनिधी) : येथील ग्रामीण रुग्णालय व कोवीड केअर सेंटरला खा.सुधाकर श्रृंगारे यांनी भेट देऊन तेथील कोवीड सेंटरची पाहणी करुन आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. खा.सुधाकर श्रृंगारे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करुन त्यांनी संवाद साधला.

यावेळी आरोग्य विभागाकडून कोविड रुग्णाच्या उपचारासंदर्भात माहिती देण्यात आली तर तेथील आवश्यक आरोग्यविषयक यंञसामुग्रीची मागणी केली असता तात्काळ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कळवून कोवीड रुग्णांच्या उपचाराकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची सूचना खा.सुधाकर श्रृंगारे यांनी केली.
याप्रसंगी तहसिलदार राहुल पाटील, पंचायत समिती सभापती रमेश सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ नारायण देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ कर्नावत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, न. पं. बांधकाम सभापती दत्ता सरवदे, सभापती उज्वल कांबळे, महेश गाडे, नगरसेवक विजय चव्हाण, लखन आवळे, भाजप शहराध्यक्ष धनंजय म्हेञे, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष अजित गायकवाड आदीसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author