दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 824
नवीन 426 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 77032 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 426 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1213 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 246 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 1901 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 180 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 85291 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6457 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1801 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 77032 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 824 आहे.