पेट्रोल खताच्या किमती कमी करा अन्यथा आंदोलन – आ. बाबासाहेब पाटील

पेट्रोल खताच्या किमती कमी करा अन्यथा आंदोलन - आ. बाबासाहेब पाटील

आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष लातूर यांचे तहसीलदार यांना निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भारतात पेट्रोलच्या किमती झपाटयाने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत त्यातच केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे तो म्हणजे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करू सरकारने केले आहे. 10.26.26 खताची किमत 600 रुपयांनी वाढली आहे तर डिएपी खताची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी खत पुर्वी 1185 रुपयांला होता तो आता 1900 रुपयांना झाला आहे. 10.26.26 खताचे पन्नास किलोचे पोते 1175 रुपयांचे होते ते आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅश खताच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करुन भाजप शासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूरच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत व खतांची व पेट्रोलची दर वाढ ताबडतोब कमी करण्यात यावी अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अहमदपूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद हेंगणे,तालुकाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष शिवाजीराव देशमुख,जी प सदस्य माधवराव जाधव,महिला जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई शिंगडे,युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले,ग्रंथालय जिल्हाध्यक्ष नबी सय्यद,फेरोज शेख,इलिआस सय्यद,युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील,संचालक श्याम पाटील,अनिस कुरेशी आदी सह शेतकरी बांधव उपस्थित होते

About The Author