अहमदपूर शहरात पेट्रोलचे दर गगनाला, पेट्रोल 100 रुपये 47 पैसे तर डिझेल 90 रुपये 57 पैसे लिटर
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले, पेट्रोल 100 रुपये 47 पैसे लिटर तर डिझेल 90 रूपये 57 पैसे लिटर झाले असुन यामुळे सर्वसामान्यचे नागरीकांचे कंबरडे मोडणार अशी अवस्था झाली आहे.
आज संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीमुळे हैराण आहे. जवळपास दोन वर्षापासुन आपण कोरोना विषाणूशी झगडत आहोत. अनेक उद्योग-धंदे बंद पडले, कारखाने बंद पडले, रोजगार बंद पडले, अनेकांना आपले नौकरी गमावावी लागली. नैसर्गिक संकटाचा समान करत आपण नाकेनऊ आले आहोत.सर्वसामान्य माणसंना जगन मुशकील झाले आहे. व्यापारी आपला व्यापार चालविण्यासाठी लॉकडाऊन कधी उठवला जातो. यांची वाट पाहता आहेत.अश्या माहामारीच्या काळात केंद्रातील सरकाराने पेट्रोल व डिझेलची भरमसाठ वाढ करुन ठेवली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल व डीझेलचे भाव वाढण्यातच आहेत.आज तर चक्क शंभर रुपये चौदा पैसे लिटर पेट्रोल झाले आहे.या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसंचे कबरडेच मोडले आहे.जीवन आवश्यक वस्तुचे दरही सध्या गगनाला भिडले आहेत.सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहे.शेतकर्यांना आपल्या शेताची नांगरणी करण्यासाठी ट्रक्टरची आवश्यकता असते. ट्रक्टर मालक डीझेल वाढ झाली असल्यामुळे आपले दर वाढविले आहेत.या दरवाढीचा फटका शेतकर्यांना बसणार आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी मशागत करुन पेरणी केली. उत्पादन चांगले झाले.पण लॉकडाऊनमुळे माल विकता आले नाही. नतंर भाव कमी झाले. एकदरीत पेट्रोल व डिझेल वाढीचा फटका मध्यम वर्गीयानच बसतो. शंभर रुपये लिटर पेट्रोल भरण्यासाठी सर्वसामान्य माणूस धस्तावत आहे. दरवाढीच्या विरोधात अनेक आंदोलन करण्यात आले.पण दरवाढ काही कमी झाली नाही. उलटच दिवसेंदिवस दर वाढ वाढतच आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे माणसं हैराण आहेत. त्यात सुलतानी संकटही वाढत आहेत.