अखेर वर्ष भरानंतर मोळवनवाडीला योग्य दाबाने विज पूरवठा..!
सम्राट मित्रमंडळाच्या पाठपूराव्याला यश..!!!
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील किनगांव पासुन जवळच असलेल्या मोळवनवाडी येथे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेला विजेचा प्रश्न अखेर सुटला असून गावाला आता योग्य दाबाने विज पुरवठा सूरळीत करण्यात आला आहे.
चारशे लोकवस्ती असलेल्या या ठिकाणी मागच्या वेळेस सूध्दा गावातील डीपी नादुरूस्त झाली तेंव्हा गावकऱ्यांनी वर्गणी करून नवीन डीपी बसविली मात्र गेल्या कांही महिन्यांपासून डीपी खराब झाली होती.गावात फक्त मंद चिमणी सारखी लाईट चालत असून यावर फॅन,कूलर,मिक्सर असे कुठल्याच मशीन चालत नव्हत्या.सध्या लाॅकडावून मूळे सर्व जन घरी बसून आहेत मात्र घरातील फॅन,कूलर चालत नसल्याने नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेवून युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी पुढाकार घेवून योग्य दाबाने विज पुरवठा करा अन्यथा महावितरण विरोधात तीव्र अंदोलन करण्याचा इशारा तहसिलदार आणी महावितरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दिला होता.
सदरील निवेदन प्राप्त होताच झोपलेले महावितरण खडबडून जागे झाले.संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गावात जावून बिघडलेला डीपी चोवीस तासाच्या आत दुरूस्त करून गावाला योग्य दाबाने विज पुरवठा सूरू केला.
गेल्या वर्षभरापासून योग्य दाबाच्या अभावी बंद असलेले घरातील फॅन,मिक्सर,कूलर ही उपकरणे चालू झाल्याने नागरिकांच्या चेहर्यावर एक प्रकारचे समाधान दिसू लागले.
तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पत्राच्या घरात तर उष्णतमूळे अबाल वृद्धांचे होणारे हाल होत होते आता फॅन चालू झाल्याने हे हाल बंद झाले आहेत.
योग्य पाठपूराव्या अभावी आणी लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षामूळे अनेक ठिकाणी अशी असंख्य प्रकरणे असून नागरिकांनी कायदेशीर मार्गाने शासनाकडे पाठपूरावा केल्यास अशा समस्या सुटल्या जातात.जनतेचे योग्य प्रश्न सोडविण्यासाठी मी आणी माझे मित्रमंडळ कायम जनतेसोबत आहे अशी प्रतिक्रीया युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी देवून अवघ्या चोवीस तासात हा प्रश्न सोडविल्या बद्दल तहसिलदार कुलकर्णी साहेब तसेच महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता काळे साहेब यांचे आभार व्यक्त केले आहेत.
एकूणच गेल्या वर्षभरापासून सूरू असलेली महत्वाची समस्या सोडविल्या बद्दल गावातील अबाल वृध्द व युवकांनी सम्राट मित्रमंडळाचे व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार व्यक्त होत आहे.