स्वर्गीय राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वतःच्या कर्तृत्वावर देशपातळीवर एका राष्ट्रीय पक्षात स्वतःचे स्थान निर्माण करणारा एक उमदा तरुण, अभ्यासू नेता आज देशाने गमावला आहे. कमी वयात राष्ट्रीय पातळीवर आपल्या स्वभावामुळे सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या या नेत्याच्या अकाली निधनाने मराठवाड्याची फार मोठी हानी झाली आहे. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जावून मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला दूरदृष्टीचा नेता अशी सातव यांची ओळख होती. अत्यंत संयमी व नम्र स्वभावाचे राजीव सातव यांच्यावर पक्षातील व पक्षाबाहेरील मराठवाड्यातील सर्वच लोक प्रेम करीत. एका आशादायी नेतृत्वाचा आज अंत झाला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आणि विलासराव देशमुख यांच्या नंतर मराठवाड्यातील राष्ट्रीय पातळीवरचा एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. पक्ष्यापलीकडे मैत्रीला जागणारा मित्र म्हणून राजीवजींना विसरने अवघड आहे. त्यांच्याबद्दल बोलताना खरंच शब्द नाहीत. केवळ निःशब्द…!
भावपूर्ण श्रद्धांजली
गणेश हाके
प्रदेश प्रवक्ते
भाजपा महाराष्ट्र राज्य