1069 रुग्णांनी केली कोरोनावर मात
नवीन 399 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 78101 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 399 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 549 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 107 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 2557 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 292 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 85684 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5750 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1833 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78101आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1069 आहे.