वाढवणा येथे लॉकडाऊन चालू असताना देखील मटका,गुटका,दारू खुले आम चालूच
वाढवणा बु. (हुकूमत शेख) : उदगीर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्येचा गाव असुन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस ठाणे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असे दोन पदाधिकारी असुन देखील कडक लॉकडाऊन सुरू असतांना फक्त भाजीपाला व किराणा दुकान सकाळी सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत चालू नंतर बंद आहेत. शनिवार व रविवार तर औषधी दुकान सोडुन सर्वच कडक बंद असताना देखील गावात एकाच गल्लीत एकाच रस्त्यावर मटका, गुटका, अवैध दारू, चिकन, मटन ,मत्स्य व्यवसाय ची दुकान खुले म सर्व लॉकडाऊन चे नियम डावलून पोलीसांच्या आशीर्वादाने सर्रास जोरात चालूच आहेत! सोशल डिस्टन्सींगचे पालन ग्रामस्थ करत नाहीत. तोंडावर मास्क लावत नाहीत, मटका, दारू, गुटख्या साठी येवरी, लाळी,बेळसांगवी, खेरडा,डाऊळ, डांगेवाडी येथूनअसंख्य मटका,दारूच्या आहारी गेलेले तरुण ग्रामस्थ एकाच गल्लीत एकाच रस्त्यावर जीवाची पर्वा न करता आपली तलब पुरी करण्याकरिता दिवस व रात्री उशिरापर्यंत ओपन- क्लोज ऐकूनच घरी जाताना दिसतात.
दारू, मटका, गुटखा
एकाच गल्लीत रस्त्यावर असल्याने गर्दीच गर्दी होत असुन मटका लागला नाही म्हणून टेन्शन मध्ये दारू ढोसतांत व गुटखा खाऊन रस्त्यावर धिंगाणा, भांडण, तंटे दररोज होत आहे.त पोलीस प्रशासनाला माहिती होऊन देखील पोलीस फक्त हया एकाच गल्लीत सर्व अवैध धंदे असल्याने या गल्लीत दररोज बाचाबाची मारामारी होत असुन देखील या गल्लीला पोलीस प्रशासनाने खुली सूट दिल्याची चर्चा जोरात चालु आहे. एकीकडे जीवनावश्यक किराणा दुकान व भाजीपाला विकुन पोट भरणाऱ्या गरीब लोकांना खाकी रुबाब दाखवून वेळेवर अकरा वाजता दुकाने बंद करण्यास भाग पाडतात. मात्र खुले आम एकाच रस्त्यावर अवैध गुटका, मटका, दारू दुकाने पोलीस बंदृका करत नसतील? असा प्रश्न गावातील प्रतिष्टीत महिला व नागरिकांना पडला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी व दारूबंदी,भेसळ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालुन अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करून गोरगरीब कुटूंबातील माय माऊली व लेकराबाळांचे आशीर्वाद घ्यावेत. कारण चौदा महिने झाले कोरोनाच्या महामारी मुळे शहरांच्या ठिकाणी काम करणारे मजुरदार गावात आल्याने बेकारी वाढली आ.हे ग्रामीण भागात काम नाही घरातून माय माउली चिंच फोडुन घर प्रपंच चालवीत असताना देखील हे आंबट शौकीन दारू, मटका, गुटक्याच्या आहारी गेल्यामुळे यांच्या खिशात दमडी नसल्याने पत्नीने लेकराबाळांनी चिंच फोडून घरखर्च भागवण्यासाठी काम केलेले पैसे देखील दमदाटी करून, मारून घेवून जाऊन दारू, मटक्याच्या, गुटक्याच्या व्यसनात घालून लेकराबळाच्या तोंडातला घास या अवैध धंदे वाल्याच्या पदरात घालत आहेत. या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असुन आता तरी वरिष्ठ अधिकारी अवैध धंदे बंद करून गोरगरीब कुटूंबाना जगण्याची संधी उपलब्ध करुन देतील का? अशी अपेक्षा ग्रामस्थ व मायमाऊली करत आहेत.