सातव यांच्या जाण्याने काॅंग्रेसचे मोठे नुकसान – राजेश्वर निटूरे

सातव यांच्या जाण्याने काॅंग्रेसचे मोठे नुकसान - राजेश्वर निटूरे

उदगीर (प्रतिनिधी) : खा.राजिव सातव यांच्या अकाली जाण्याने काॅंग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्रा चे मोठे नुकसान झाले आहे असे विचार काॅंग्रेसचे नेते राजेश्वर निटूरे यांनी व्यक्त केले.ते उदगीर  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात  खासदार राजीव सातव यांना काँग्रेस पक्षातर्फे श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते.पुढे बोलतांना निटूरे म्हणाले की,काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे   जाण्यामुळे केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच पक्षातील नेत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या छोट्याशा शहरातून पुढे येत ते दिल्लीतील महत्त्वाच्या राजकारण्यांपैकी एक बनले. 

काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना सायटोमेगॅलो या विषाणूचा संसर्ग झाला होता. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. ते 47 वर्षांचे होते. राजीव सातव म्हणजे दिल्लीतला महाराष्ट्रातला सर्वांत तरुण चेहरा. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि राहुल गांधींचे विश्वासू सहकारी अशी राजीव सातव यांची ओळख होती. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य म्हणून संघटनेसाठी काम पाहिले असे सांगीतले. 

 उदगीर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर जी निटूरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्याण बापूसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ  सिद्धेश्वर पाटील, शहराध्यक्ष मंजूर खान पठाण, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटुरे, विधानसभा बूथ समन्वयक विजयकुमार चवळे, तालुका बूथ समन्वयक अहमद सरवर, फैजु खान पठाण, प्राध्यापक शिवाजीराव देवणाळे, संतोष बिराजदार, उपसभापती प स बाळासाहेब मरलापल्ले, प्राध्यापक धनाजी जाधव, संचालक सुभाष धनुरे, नगरसेवक अनिल मुदाळे, संतोष वालसने, शशिकांत  बनसोडे, संजय काळे, संजय पाटील, श्रीनिवास एकुर्केकर, आदर्श पिंपरे, अमोल घुमाडे, कपिल शेटकार, माधव कांबळे, विकी वाघमारे, सद्दाम बागवान, ज्ञानेश्वर आपटे, अविनाश गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author