राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने केंद्र सरकारने वाढविलेल्या बी- बियाणे, खते महागाई व इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने केंद्र सरकारने वाढविलेल्या बी- बियाणे, खते महागाई व इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा

निलंगा ( नाना आकडे ) : शेतकरी विरोधी धोरण असलेले सरकार केंद्रात आले असुन मागील सहा महिन्यापासुन काळ्या कृषी कायद्या संदर्भात ब्र शब्दही न काढणार्‍या सरकारचा जाहीर निषेध रा.काॅं.च्या वतीने यावेळी करण्यात आला. 

बी, बियाणे, खते, डिएपी, 10:26:26 यांच्या दरांमध्ये 50 ते 60 टक्के दरवाढ करण्यात आली असुन शेतकरी वर्ग अगोदरच खचलेला आहे, त्यातच ही तुघलकी दरवाढ मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

पेट्रोल, डिझेल यांचे दर मागच्या 70 वर्षात ज्यांना जमले नाही ते या मोदी सरकारने दरवाढ करुन पेट्रोल, डिझेल चे दर शंभरी पार केले. यामुळे शेतीविषयक कामे महागली आहेत, तर शेतकर्‍यांनी पिकवायचे काय?  मेहनतीचा मोबदला ही पुरेसा भेटत नाही. अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे. 

दिडपट हमीभाव देतो म्हणणारे सरकार पेट्रोल, डिझेल, बी, बियाणे, खते यामध्ये दिडपट वाढ करण्यात आली याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलंगाच्या वतीने यावेळी करण्यात आला. 

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार गायकवाड समितीचा अहवाल स्विकारुन तो अमलात आणण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी.  मराठा समाजास आरक्षण देणेकरिता  सरकारने पावले उचलावित अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. 

केंद्राने कोव्हिड 19 च्या लसीकरणाचा वेग खेडोपाडी जास्तीत जास्त पुरवठा करुन शेतकरी वर्गांना पेरणीला खंड पडणार नाही. अशी व्यवस्था करावी. 

बी, बियाणे, खते याचा मागील साठा हा जुन्याच दरात वितरण करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावे. 

या मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी निलंगा विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे, कार्याध्यक्ष संदिप मोरे, ओबीसीचे बालाजी जोडतल्ले, जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदुरे, अंगद जाधव, युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, सुग्रीव सूर्यवंशी, महेश मसलगे,विद्यार्थी काॅंग्रेस चे सुमित जाधव, सुरज जाधव, विश्वजीत पाटील, प्रकाश हसवले, अभय चौधरी, युवती काॅंग्रेसच्या राधा जगताप, शुंभागी जोडतले, वनमाला होनमाळे, महिला आघाडीच्या महादेवी पाटिल, रेश्मा कांबळे, देशपांडे मँडम, किसान सेल चे सुरेश रोळे, पंढरी पाटिल, जीवन तेलंग,गफ्फार लालटेकडे, राजेश माने, राम पाटिल, सचिन चव्हाण, लक्ष्मण क्षीरसागर,लिगल सेल चे अँड. गोपाळ इंगळे, अँड. अवधुत नाईक, अँड. हरिभजन पौळ इत्यादी उपस्थित होते.

About The Author