निर्देशित केलेल्या एमआरपी नुसार खतांची विक्री करा अन्यथा गुन्हा दाखल करू – जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्र

निर्देशित केलेल्या एमआरपी नुसार खतांची विक्री करा अन्यथा गुन्हा दाखल करू - जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्र

धडक कार्यवाही करण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांना  गुन्हे दाखल करण्यासाठी दिल्या सूचना

     

लातूर (एल.पी.उगीले) : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी वर्ग खताची जमवाजमव  करण्याच्या कामात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत  शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, म्हणून कृषी विभागाने जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना ई- पॉस मशीन द्वारे एमआरपी नुसार खत विक्री करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.  ज्यादा दराने खत विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. असे आवाहन श्री राहुल केंद्रे यांनी करीत जादा दराने खत विक्री करण्या-याविरोधात गुन्हा नोंदवला जाईल असेही सांगितले.

 पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शेतकरी पेरणी पूर्वतयारी करीत आहेत. काही शेतकरी बियाणे व खतांची जमवाजमव करत असून शेतकऱ्यांना अधिक दराने रासायनिक खताची विक्री केली जाऊ नये,  एमआरपी नुसार खताची विक्री करावी. तसेच ई-पॉस मशीनद्वारे आधार कार्डाचा वापर करावा. खत बियाणे खरेदी करताना दुकानदाराकडून कडून पक्की पावती घ्यावी. असेही आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

खत विक्रेते खताच्या पोत्यावरील निर्देशित एमआरपी पेक्षा जास्त दराने खते विक्री करीत असतील,  दुकानदार कच्च्या पावतीवर खते विक्री करत असतील किंवा खत उपलब्ध असतानांही खताची विक्री करत नसतील असे प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्याकडे तक्रार करावी. शेतक-यांच्या हिताच्या आड येणा-या  दुकानदारा विरूद्ध थेट गुन्हा नोंद करण्यात येईल. असे लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 

About The Author