दिवसभरात 922 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

दिवसभरात 922 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 641 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 79023 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 641 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1508 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 214 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 2919 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 427 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 86302 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5750 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1862 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 79023आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 922 आहे.

About The Author