माणूसपणाची जाणीव करून देणाऱ्या गोष्ट – वर्षाराणी चव्हाण

माणूसपणाची जाणीव करून देणाऱ्या गोष्ट - वर्षाराणी चव्हाण

उदगीर (प्रतिनिधी) : संकटाशिवाय जीवन कोणाचेच नाही, तरीदेखील आज प्रत्येक जण संकटाला तोंड देत जगण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. संकटात एकमेकांना मदत करणे, ही माणुसकी होय. स्वतः वर आलेल्या संकटाला धाडसाने सामोरे जात असताना मी संकटाला हरवणारच ही जिद्द मनात ठेवली तर त्यावर सहज विजय मिळवता येतो. आपण आपले कुटुंब आणि समाज या सगळ्यांमध्ये जगताना संकटकाळात प्रत्येकाबरोबर कसं वागलं पाहिजे, स्वतःला सांभाळत इतरांनाही कसं सहकार्य केलं पाहिजे अशा माणूसपणाची जाणीव करून देणाऱ्या गोष्टी माणसाच्या होत असे मत वर्षाराणी चव्हाण यांनी व्यक्त केले.

      आजच्या पिढीत वाचन संस्काराची रुजवणूक व्हावी म्हणून चला कवितेच्या बनात या चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी कोरोना  परिस्थितीतही अविरतपणे आणि सातत्याने वाचक संवाद चालू असून याच मालिकेतील २४१ वे पुष्प फेसबुक लाईव्ह आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश तांदळे हे होते तर त्यांच्या पत्नी वर्षाराणी चव्हाण यांनी सुधा मूर्ती लिखित व लीना सोहोनी अनुवादित  गोष्टी माणसांच्या या साहित्यकृतीवर संवाद साधताना माणसांचा सच्चेपणा लेखिकेने आपल्या जीवनातील अनेक प्रसंग, व्यक्तीच्या स्वभावाचे आणि प्रसंगाचे केलेले वर्णन. कुटूंबातील स्नेहपूर्ण नाते, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे संबंध आणि जबाबदारी, समाज ऋण, दातृत्व आणि माणुसकी इत्यादी संदर्भात विचार प्रवर्तकत एकूण ३२ गोष्टींचे सुंदर रेखाटन या साहित्यकृतीत केलेले असल्याने सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. असे मत व्यक्त केले.यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या माणसांच्या जीवनात प्रेरणादायी व सकारात्मक बदल घडवून आपले जगणे माणूसपणासह सोपे करतील अशा अत्यंत प्रभावीरीत्या चव्हाण यांनी कथन केल्या.

        जि.प.अधयक्ष राहुल केंद्रें ,सोनीया पवार,चारूशीला पाटील, वैशाली खंदारे, डॉ. भाऊसाहेब मिस्तरी, अश्विनी मोरे,रोशन मुल्ला, सुरेखा माळी, ज्ञानोबा घोगरे आदिंसह अनेक मान्यवर कार्यक्रमास लाईव्ह उपस्थित होते. यावेळी सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देऊन संवादिका व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर महेश तांदळे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रत्येकाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार कु.अराध्या तांदळे हिने मानले.

About The Author