खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली व शोकसभा

खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली व शोकसभा

अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यमान सचिव संसद रत्न तथा राज्यसभेचे खासदार अँड. राजीव सातव यांना श्रद्धांजली शोकसभा कार्यक्रम घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराज दाढेल लोहेकरअखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय माजी अध्यक्ष काँग्रेस समितीचे विद्यमान सचिव संसद रत्न तथा राज्यसभेचे खासदार अँड. राजीव सातव यांना लोहा-कंधार. मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या उपस्थित शोकसभ घेण्यात आली. यावेळी सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते दिवंगत नेते राजीव सातव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मौन बाळगून यावेळी भावपूर्व श्रद्धांजली अर्पण केली.आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की, अ‍ॅड. खा. सातव यांच्या अवेळी जाण्याने पक्षाचे खुप मोठे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यांच्या निधनाने तीव्र दुःख व्यक्त करीत नीतीने मराठवाड्यातीलकै. विलासराव देशमुख कै. गोपीनाथराव मुंडे कै. प्रमोद महाजन दिवंगत खासदार राजीव सातव अशा उमद्या नेत्यांना नीतीने हिरावून घेतले.
हिंगोली, मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे देश पातळीवर नेतृत्व करीत होते. लहान वयात मोठ मोठ्या जबाबदार्‍या सहजपणे पेलावत होते. गुजरात राज्याचे काँग्रेसचे ते प्रभारी होते सकारात्मक असा दृष्टिकोण असतं शांत, संयमी व अभ्यासू असे व्यक्तिमत्व होते त्यांचे निधन हे सर्व क्षेत्रास सर्व स्तरावर धक्का देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठवाडा, महाराष्ट्र संपूर्ण देशाचे नुसकान झाले आहे, योवळी बोलताना माजी नगरसेवक रमेश माळी म्हणाले कि, खा.मा.राजीवभाऊ सातव यांचं कोरोनाने. निधन झाल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक व दुःख आहे महाराष्ट्राच्या ओ बी सी चा आवाज आज शांत झाला. सर्वात मोठी समाजाची हानी झाली. सातव परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयातश्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावेळी खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम आण्णा पवार, सुधाकर सातपुते. प्रा.गोरे सर. बालाजी मामा खिलारे ज्ञानेश्वर पवार. पुंडे सर. सरपंच शंकर माने, सतीश कराळे, अशोक पाटील कळकेकर सिद्धू वडजे नागेश खांबेगावकर, प्रसाद जाधव , अमोल गोरे, सचिन पाटील कल्याणकर , अशोक सोनकांबळे, पत्रकार बांधव कार्यालयात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळत शोकसभा संपन्‍न झाली.

About The Author