दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 914

दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 914

नवीन 420 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 79937 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 420 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.आहे

लातूर जिल्ह्यात 1221 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 142 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. प्रलंबित मधील 46 पॉझिटिव्ह आढळले आहेत. 3083 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 253 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 86499 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4673 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1889 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 79337 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 914 आहे.

About The Author