खंडाळी मोबाईल टॉवर बॅटरी चोरणारी टोळी 24 तासात गजाआड
किनगाव पोलीसांची दमदार कामगिरी
अहमदपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खंडाळी येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारे चौघे जण किनगाव पोलीसाच्या हाती लागले आहेत. पोलीसांनी २४ पैकी १० बॅटऱ्या व चोरीत वापरलेली बोलेरो पिक आप जप्त करून चौघाना मंगळवारी अहमदपूर न्यायलयासमोर हजर केले आसता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अहमदपूर तालुक्यातील खंडाळा येथील जिओ कंपनीच्या टॉवरच्या एच बी एल ४०० एच च्या२४ बॅटऱ्या अंदाजे किंमत २४ हजार रु. दि१० मे ते १४ मे रात्री १० वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याची तक्रार जिओ टेक्निशियन गणेश वैजेनाथ जाधव यांनी दि१७ मे रोजी दिली होती. या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात किनगाव पो.स्टे.ला गुरन १३२ / २१ कलम ४५४ , ४५७ , ३८० भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. किनगाव पोलीसांनी गुन्ह्यातील आरोपी गजाआड केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले व सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे ,पोहेकॉ रामचंद्र गोखरे , पो. ना. व्यंकट महाके,पो. ना. सुग्रीव देवळे, पो शिपाई नागनाथ कातळे, होमगार्ड प्रताप गायकवाड व व्यंकट दहिफळे यांनी तपासाची चक्रे फिरविली आणि गुप्त माहितीच्या आधारे शुंभूदेव नागोराव चव्हाण ( २८ ) यास राहत्या घरातून ताब्यात घेतले. यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. संपूर्ण माहिती दिली, बोलेरो पिकअपच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले . पोलीसांनी शुंभदेव चव्हाण यांच्या घरातून २४पैकी १० बॅटऱ्या हस्तगत केल्या. गुन्हयात वापरलेली बोलेरो पिकअप क्र एम एच २६ एडी ५६८७ ही अर्जुन गोविंद चव्हाण ( २९ )रा. पार यांच्या कडून ताब्यात घेतली. या चोरीमध्ये शुंभूदेव नागोराव चव्हाण, , अर्जुन गोविंद चव्हाण , उमाकांत बाबुराव चव्हाण ( ३९ )रा रुद्धा व अशिफ हसनसाब शेख ( ३८ ) रा. काळेगाव रोड अहमदपूर या चोघाना पोलीसांनी या प्रकरणी अटक केली आहे. आरोपींना अटक करून अहमदपूर न्यायलयासमोर हजर केले आसता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . पुढील तपास किनगाव पोलीस स्टेशनचे सपोनी शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामचंद्र गोखरे, मुरलीधर मुरकुटे हे करित आहेत.