गरीबांच्या मदतीला धाऊन गेली इनरव्हिल क्लब
उदगीर (एल.पी.उगीले) : येथिल इनरव्हिल क्लब यांच्या मार्फत ज्यांना शिधा पत्रिका नाही अशा गरजूंना मोफत धान्याचे कीट वाटप करण्यात आले. गोरगरिबांच्या मदतीला सतत धाऊन जाणारी ही सामाजिक जाणीवा जपणारी स्वंयसेवी संस्था आहे.कोणताही राजकिय स्वार्थ न ठेवता,केवळ सामाजिक जाणीवा जपत,सर्वसामान्यांच्या हितासाठी इनरव्हिल क्लब काम करत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या लाॅकडाऊन चालु आहे,रोजी रोटी असलेले आणि या काळात कामधंदा गमावलेल्या आणि ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत,अशा लोकांना शासनाकडून पुरवठा होणारे मोफत अन्नधान्यमिळण्यात अडचणी येत आहेत.त्या गरीबांच्या चुली पेटल्या पाहिजेत,या भावनेने इनरव्हिल क्लबने पुढाकार घेऊन स्वखर्चाने अन्नधान्याचे किट वाटप केले आहेत,
प्रोजेक्ट मेनेजर सौ. निलिमा पारसेवार यांच्या सहकार्याने लोणी येथील वीटभट्टी वरील गरजु महिला, रेल्वे स्टेशन वरील गरजु महिला यांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. ४० कुटुंबांना राशन किट चे वाटप करण्यात आले. त्या किट मध्ये जीवनावश्यक वस्तु साखर, गोडतेल, तांदूळ, दाळ, गव्हाचे पीठ, बिस्किट याचा समावेश होता.
या वेळी इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सौ. मिरा चेंबुले, सचिव सौ. शिल्पा बंडे, सौ. स्वाती गुरूडे, सौ. स्नेहलता चणगे, सौ. निलिमा पारसेवार, सौ. मानसी चन्नावार, सौ. अनुराधा मुक्कावार, सौ. वर्षा तिवारी यांची उपस्थिती होती.
इनरव्हिलच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.इतरही स्वंयसेवी संस्थांनी इनरव्हिल क्लबचा आदर्श घेऊन समाज कार्यात पुढाकार घ्यावा ,असे बोलले जात आहे.