पेट्रोल, खताच्या किमती कमी करा
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने अंदोलनाचा इशारा
चाकूर (गोविंद काळे) : पेट्रोल खताच्या किमती कमी करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चाकुर च्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकार मुळे भारतात पेट्रोलच्या किमती झपाटयाने वाढत आहेत. याच फटका सर्वसामान्य जनतेवर बसला आहे. सध्या देशात व राज्यात कोरोनाचे महाभंयकर संकट आहे.जनतेचे महागाईमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे.जगाचा पोशिंदा म्हणून ज्यांची ओळख आहे.बळीराजाला खत बी-बियाणे यांची भरसाठ वाढ झाल्याने ते खचुन गेले आहे.शेतातील मशागतीचा खर्च गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट वाढला आहे.सब का साथ सब का विकास हा नारा देऊन केंद्रात सत्ता काबिज केल्यानंतर जनतेला सतत महागाईत वाढच होताना दिसत आहे. सामान्य माणसच जगन सध्या कठीण झाले आहे.केंद्र सरकारने बळीराजाचा तरी विचार करावा व वाढलेले दर कमी करावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.गेल्या दोन वर्षापासुन लॉकडाऊन आहे जगायचे कसे?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम भारत सरकारने केले आहे. 10.26.26 ची किमत 600 रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी 1185 रुपयांला होता तो आता 1900 रुपयांना झाला आहे. 10.26.26 चे पत्रास किलोचे पोते 1175 रुपयांचे होते ते आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करुन भाजपशासित केंद्र सरकारने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकुर तालुका च्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत व खतांची व पेट्रोलची दर वाढ ताबडतोब कमी करण्यात यावी अन्यथा तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तहसीलदार चाकुर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चाकूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे, शहराध्यक्ष गणेशराव फुलारी, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ काळे, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य गणेश शिंदाळकर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष समाधान जाधव, सुरेंद्र सावंत आदींच्या स्वाक्षर्या आहेत.