अमृत जलवाहीनीला हडोळतीकरांचा हिरवा कंदील
अहमदपुर (गोविंद काळे) : उदगीर नगरपालीका व तेजस कन्सट्रशन च्या हडोळतीचे रस्ते पुर्नबांधणीचे लेखी अश्र्वासनानंतर अमृत जलवाहीनीला हडोळतीकरांनी हिरवा कंदील दिला असून मात्र जलवाहीनीमुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अमृत योजनेअंर्तगत लिंबोटी (जि. नांदेड ) येथील मध्यम प्रकल्पातून उदगीरला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहीनी टाकण्य़ाचे काम सुरू होत या जलवाहीनीच्या कामामुळे हडोळती येथील मुख्य रस्ता खोदण्यात येत असल्याने संभाव्य नुकसानीबाबात दाद मागण्यासाठी सदर काम बंद करण्याचा निर्णय हडोळतीकरांनी घेतला होता. याबाबत .लातूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उदगीर नगरपालीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत राठोड, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक अॅड. दत्ता पाटील, ताहेर हुसेन, महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता एस व्ही कायंदे, उदगीर विभागाचे एस बी नागरगोजे, नगरपालीकेचे कटके, तेजस कन्सट्रक्शनचे अभियंता गणेश पाटील यांच्या उपस्थीतीत हडोळतीला झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत तांत्रीक अडचणीबरोबर रस्त्याचे होणारे नुकसानाची भरपाई करून देण्याच्या उदगीर नगरपालीका व तेजस कन्सट्रक्सनच्या लेखी अश्र्वासनानंतर सदर रस्ता खोदकाम करण्यास नागरीकांनी अनुमती दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे खोदकाम होत असल्याने हडोळतीकरांच्या अडचणी लक्षात घेवून तातडीने रस्त्याची पुर्नबांधणी करण्याची सुचना उपविभागीय अधिकारी कुदळे व तहसीलदार कुलकर्णी यांनी केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शादुल शेख, प्रदीप नायणे, संग्राम भोगे, माधव पवार, वैजनाथ निजवंते, गणेश काळींग्रे, अजीम मनियार, दत्ता हेंगणे, अजमद पठाण, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गिरी, तलाठी विठ्ठल घुमनवाड, पोलास पाटील बालाजी मिरकले सह अन्य नागरिक उपस्थीत होते.
चौकट : अमृत योजनेअंर्तगत उदगीरला जाणाऱ्या जलवाहीनीचे कामाची पहाणी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, उदगीर नगरपालीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, महाराष्ट्र जिवन प्राधीकरणाचे एस व्ही कायंदे, एस बी नागरगोजे आदींनी पहाणी केली.