बँकामध्ये कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लामजना शाखेचा प्रकार
औसा (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून कोरोना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर पाळा असे आवाहन करण्यात आले आहे मात्र लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लामजना येथील शाखेत लोकांनी केलेली गर्दी कोरोना नियंत्रण देणारी ठरु शकते.
केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले आहेत. दरम्यान या काळात आर्थिक तंगीत असल्यामुळे अनेक लोकांनी दोन हजार रुपये व इतर पैसे काढण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी केली. अनेक दिवसाच्या सुट्टीनंतर बँका उगडल्या आहेत.
बँकेचे गेट उघडताच अनेक जणांनी पैसे काढण्याच्या स्लिप घेण्यासाठी व आपल्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी बँकेसमोर मोठया प्रमाणावर गर्दी केली जात आहे.
यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारी शासनाची स्थानिक यंत्रणा गायब असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेणे गरजेचे असताना, जिल्हा मध्यवर्ती बँके कडून होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.