सार्वजनिक ठिकाणच्या ६२५ वृक्षांचे लांजी येथे संगोपन
सामाजिक कार्यकर्ते रामानंद मुंडे लांजीकर यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील लांजी येथील सामाजिक कार्यकर्ते रामानंद मुंडे लांजीकर यांनी गावातील सार्वजनिक ठिकाणच्या ६२५ वृक्षांची लागवड करण्यासाठी खोदकाम व लागवड खर्च आसे एकूण १ लाख २५ हजार रुपये स्वखर्चाने केले आहे.बिहार पॅटर्न अंतर्गत संगोपनाची जवाबदारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यामुळे सात महिन्यांपासून ते लागवड केलेल्या वृक्षांना रखरखत्या उन्हाळ्यात लावलेली रोपे वाळून जाऊ नयेत म्हणून सकाळी ६ ते ९ या वेळेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजना अंतर्गत वृक्षांना पाणी देत आहेत. स्वतः रामानंद मुंडे हे वृक्षांना पाणी दिले का नाही याची पाहणी करतात. यामुळे गावातील वातावरणात ऑक्सीजनचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या वृक्ष लागवडीचा गावातील वातावरणात परिणाम दिसत आहे.अहमदपूर तालुक्यातील लांजी येथील सामाजिक कार्यकर्ते रामानंद मुंडे यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये गावातील भाग क्रमांक एक जिल्हा परिषद शाळा समोर, मुख्य रस्ता लांजी तांबट सांगवी,विळेगाव जाणारा लांजी गावातील डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने , महेताब पटेल यांच्या घरापर्यत,भाग क्रमाक दोन सौर उर्जा प्लांट च्या पुर्वेस जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं आसे एकुण ६२५ झाडांचे या सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले. यापैकी ४०० झाडांना ट्री गार्ड लावण्यात आले आहे.
लागवडीपासून ते आजपर्यंत झाडे जगवण्यासाठी ते स्वतः वृक्षांची सातत्याने पाहाणी करतात. रामानंद मुंडे यांचे वृक्षसंगोपनासाठीचे कार्य पाहून गावातील काही नागरिकही या वृक्षांच्या संगोपनासाठी त्यांना सहकार्य करत आहेत. यामध्ये सरपंच रुक्मिणीताई कदम, उपसरपंच कालिदास कदम, संतोष कदम, राजेश चीलकरवर, मनोहर आगलावे, देवदास गायकवाड सुवर्णाताई कचवे, सत्यभामा मुंडे, गौतम गायकवाड,नागनाथ मुंडे, कैलास आगलावे, विकास पोपतवार, शंकर आगलावे, यांनी सहकार्य केले. लागवड केलेल्या वृक्षांमध्ये लिंब,वड, पिंपळ, अशोक, जांभळ, कदंब, चिंच, नांदुरकी ,रानचाफा,पिंटोपॉम,
सप्तपर्णी,बांबू ( वेळू), पिथोडीया ,बेगोनिया,लिंबया वृक्षांचा समावेश आहे.रामानंद मुंडे यांनी वृक्षसंगोपनासाठी घेतलेला पुढाकार हा पर्यावरण संतूलनाच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी आहे तसेच ग्रामस्थांच्या पुढाकाराची देखील गरज आहे.
पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी गावात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची गरज आहे.यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या झाडांना पाणी देऊन मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्याची गरज आहे. यासाठी लहान मोठ्या सर्वच नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. तरच गावात हिरवळ वाढण्यास मदत होईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांजी गावामध्ये पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी ऑक्सिजनची निर्मितीसाठी येत्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहे. या वृक्ष लागवडीसाठी गावातील तरुण , नागरिक वेळोवेळी मला पूर्ण सहकार्य करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. हे पूर्ण गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याने शक्य झालं ६२५ वृक्ष लावू शकलो.पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी मी ऑक्टोबर महिन्यामध्ये ६२५ वृक्ष लागवड केली होती.त्या झाडांची संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतने स्वीकारलेली आहे. आगामी काळात जून महिन्यामध्ये अजून गावात ३००० वृक्षांची लागवड करणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केल्याने हे शक्य झालं व ६२५ वृक्ष लावू शकलो .
- रामानंद मुंडे,
सामाजिक कार्यकर्ते
लांजी.