कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांना रणरागिणी पुरस्कार

कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांना रणरागिणी पुरस्कार

 उदगीर (एल. पी.   उगीले) : उदगीरची भूमिकन्या आणि विद्यमान स्थितीत अहमदनगर येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या क्रांती चौधरी यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून कला, क्रीडा, साहित्य शांतिदूत परिवार पुणे यांनी आयोजित साम्राज्य रियालिटी प्रस्तुत रणरागिनी पुरस्कार 2021 संयोजकांनी जाहीर केला आहे. यापूर्वीही क्रांती चौधरी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य स्तरावरील पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलेले आहे.

 एक अधिकारी म्हटल्यानंतर सामान्यपणे आपल्या भौतिक सुविधांमध्ये गुरफटलेला आणि शासनाच्या गाडीमधून फिरणारा, बंगल्यामध्ये राहणारा अशी प्रतिमा समोर येते! मात्र क्रांती चौधरी त्याला अपवाद आहेत. स्वतः शेतकर्‍यासोबत शेतात जाऊन, शेतीविषयक वेगवेगळे प्रयोग त्या प्रत्यक्ष करून दाखवतात इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला विपणन शास्त्राचे गुपिते सांगतात किरकोळ व्यापार करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न चमत्कारिकरित्या पाच पटीने त्यांनी वाढून दाखवले आहे. लॉक डाऊन च्या काळात शेतीमालाची मोठी गोची झालेली असताना, शेतमाल खराब होऊ नये, पडून राहू नये. यासाठी त्यांनी शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र ग्रुप काढून शेतकरी यांच्यापासून  त्यांचा माल विकत घेणारे दलाल आडते हे कमी भावात माल घेऊन जास्त भावात विकायचे. ही शेतकऱ्यांची गोची विचारात घेऊन क्रांती चौधरी यांना एक कल्पना सुचली, शेतकऱ्यांचा माल प्रत्यक्ष ग्राहका पर्यंत पोहोचला पाहिजे. या उद्देशाने त्यांनी समाज माध्यमांचा वापर करायचा ठरवला. आपल्या ओळखी, उपलब्ध बाजारपेठा यांच्या माहितीचा फायदा शेतकऱ्यांसाठी जरा करावा. या उद्देशाने शेतकऱ्यांना विक्रीकरता योग्य व्यासपीठ मिळवून देत ग्राहक पण फायद्यात राहू लागला आणि शेतकऱ्यांचा फायदा होऊ लागला. अशा पद्धतीचा एक ग्रुप तयार करून त्यांनी शेतमाल विक्री करायला सुरुवात केली. चांगल्या प्रतीचा माल ग्राहकापर्यंत सरळ मिळू लागल्याने दोघांचाही फायदा होऊ लागला. शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना आता महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात लागू केली आहे.

 क्रांती चौधरी यांच्या या उत्कृष्ट कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाने केलाच आहे, तशाच पद्धतीने कला, क्रीडा, साहित्य शांतीदूत परिवार पुणे व साम्राज्य रियालिटी प्रस्तुती रणरागिणी पुरस्कार देऊन त्यांना गौरवान्वित केले आहेत.

About The Author