निराधारांना मिळतोय जिल्हा बँकेचा आधार; २१२२८ निराधारांना ६ कोटी रुपये घरपोच वाटप

निराधारांना मिळतोय जिल्हा बँकेचा आधार; २१२२८ निराधारांना ६ कोटी रुपये घरपोच वाटप

बँकेचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १०० शाखेतून निराधारांना मिळतोय आधार

लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या माहामारीत संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत अपंग, वृध्द, निराधार लोकांना बँकेत येवून पैसे काढण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आठ दिवसांपासून जिल्ह्यात १०० शाखेच्या माध्यमातुन निराधार लोकांना घरपोच अनुदान बँकेतील अधिकारी कर्मचारी वाटप करीत असून आतापर्यंत जिल्ह्यात २१२२८ निराधार लोकांना ६ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून त्यासाठी जिल्हा बँकेने प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत लोकांना आधार देण्याचे काम केले आहे अशी माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांनी दिली आहे. राज्यात घरपोच निराधार लोकांना अनुदान देणारी राज्यातील लातूर जिल्हा बँक पहिली असून लातूर बँक सलग दुसऱ्या वर्षीही लोकांना कोरोना च्या साथीमुळे सामजिक कार्य म्हणून सेवा बजावत आहे.

लातूर जिल्ह्यात कोरो नाच्या साथीमुळे कडक लॉक डाऊन व संचारबंदी असल्याने अनेक निराधार लोकांना गावातून बाहेर पडायला शक्य होत नाही अनेक लोक अंध अपंग वृध्द असल्याने त्यांना बँकेपर्यंत येणं शक्य नाही अशा परिस्थितीत बँकेचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांच्या कल्पक नेतृत्वाखाली सक्षमपणे सलग दुसऱ्या वर्षीही घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला त्यामूळे निराधार लोकांना आपल्याच गावात येवून बँकेचे कर्मचारी अनुदान गावातील ग्रामपंचायत व मंदिराच्या आवारात सोसायटीचे चेअरमन व स्थानिक पातळीवरील सरपंच यांच्या समक्ष लाभार्थ्यांना थेट घरपोच सेवा देत आहेत त्यामूळे लोकांना जिल्हा बँकेचा आधार मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात शासनाकडून जिल्हा बँकेकडे निराधार योजनेचे अनुदान प्राप्त झाले असून तातडीने अंमलबजावणी करत जिल्ह्यात २१ मे पर्यंत तब्बल ५ कोटी ६७ लाख रुपये वाटप करण्यात आले असून त्यात तालुकानिहाय वाटप याप्रमाणे करण्यात आले आहे. लातूर तालुका (१ कोटी १६ लाख १४ हजार रुपये) औसा तालुका(१ कोटी २७ लाख १४ हजार रूपये) निलंगा तालुका (५० लाख ५० हजार) उदगीर तालुका ( ४५ लाख ५२ हजार रुपये) अहमदपूर तालुका ( ४६ लाख ७० हजार रुपये) चाकुर तालुका (४४ लाख १८ हजार रुपये) रेणापूर (३९ लाख ६७ हजार रुपये) जळकोट (४ लाख ५० हजार रुपये) देवणी तालुका (१९ लाख ८० हजार) शिरूर अनंतपाळ तालुका ( ७२ लाख २५ हजार असे एकूण ५ कोटी ६७ लाख रुपयांचे वाटप निराधार लोकांना घरपोच देण्यात आले असून त्यात तब्बल २१२२८ लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे उर्वरित अनुदान वाटप प्रक्रिया वेगाने असून लवकरच थेट लाभार्थ्यांना घरपोच सेवा देणार येत आहे यासाठी गावातच निराधार लोकांनी थांबावे बँकेत गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ कार्यकारी संचालक हणमंत जाधव सन्माननीय संचालक मंडळ यांनी केले आहे.

About The Author