रमाबाई अन्नसेवा योजनेचा आज २८ वा दिवस
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जंयती उत्सव समिती चा सामाजिक उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अंतर्गत रमाबाई अन्नसेवा योजनेद्वारे आता पर्यंत लातूर शहरांमध्ये १४००० जेवणाचे टिफीन व १४००० पाणी बॅाटलचे वाटप करण्यात आले आहेत. आपल्या युवा कार्यकर्त्यांना सोबत घेवून समाजासाठी काही तरी केले पाहिजे, असा उत्साह असलेला धडपडी , कशाचीही पर्वा न करता जिद्दीने काम करणारा तरुण निखिल शिवाजी गायकवाड यांची डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी निवड झाली. या तरुण मंडळाने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती काहीतरी वेगळेपण राखून, नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरी करण्याचे ठरवले. या नियोजनानुसार १३ एप्रिल रात्री ११ वाजून ५९ मिनीटानी आंबेडकर पार्क वर नवीन डिजीटल बोर्डचे अनावरण करण्यात आले आणि डॅा.बाबासाहेब आंबेडकराना वेगळ्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले. अंत्यत शांततेत, कोव्हिड नियंमांचे पालन करून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांचे कौतुकही केले.
कोव्हिड साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणऱ्या लोकांना जगणे मुश्कील झाले. त्यात दवाखान्यात दाखल झालेल्या – आजारी माणसासोबत असलेल्या व्यक्तीला रोजच्या जेवणाची सोय नव्हती, प्रसंगी उपाशी राहून ते आजारी माणसाची सुश्रुषा करत. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हे ब्रीद घेऊन या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीद्वारे ‘ रमाबाई अन्नसेवा योजना ‘ सुरु करण्याचा निर्धार अध्यक्ष निखील गायकवाड यांनी केला. बाहेर गावांच्या आजारी लोकांना व त्याच्या नातेवाईकांना दररोज एक वेळेचे जेवण सुरु करण्यात आले. सुरुवातीला लातूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सुधाकर शृंगारे व त्याचे पुत्र शंकर शृंगारे यांनी मदत केली. पुढे काही कारणांमुळे ही मदत बंद करण्यात आली, परंतु निखील गायकवाड यांनी स्वतः लोकांच्या सहकार्याने ती आज पर्यंत चालु ठेवली. जोपर्यंत लॅाकडाऊन चालु आहे तोपर्यंत ही अन्नसेवा चालुच ठेवण्याचा निर्धार बोलून दाखविला. ईद-ए- मिलाद या दिवशी प्रवीण केंद्रे यांनी लातूर शहरातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये ब्रिज हॅाटेलमधील ५० किलो गुलाब जामून वाटप करून पोलीसांप्रती आदर व्यक्त केला.
युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे, इंद्रजित बैकरे, प्रवीण केंद्रे, महेश टीळे, एस. आर. ग्रुपचे सूरज राऊत, भटक्या विमुक्तचे हरिभाऊ गायकवाड, प्रमोद गायकवाड, विकास गायकवाड, रॅाकी सरवदे, दिग्विजय गोडबोले, प्रशांत कोथिंबीरे, निलेश मांदळे, तामिळनाडू चे राज पारी; अमेरिकेहुन सारिका राहूल गायकवाड, प्रा.डॅा.रोहित गायकवाड, एस.आर. बनसोडे आदिनी आर्थिक साह्य केले आहे. हे अत्यंत मोलाचे योगदान आहे.
रमाबाई अन्नसेवा योजना सुरु करताना प्रारंभापासूनच प्रामुख्याने मा. विजयजी अनंतराव लांडगे, भैया वाघमारे, विशाल कोथिंबिरे, अक्षय धावरे, सुनील घोडके, क्षितिज कांबळे, बाबा कांबळे, बंटी गायकवाड, सुरज ढगे, प्रतीक वाघमारे, केदार कोथिंबीरे, ऋषी जाधव, समाधान घोडके, समीर लातूरकर, मयूर कदम, जयमाला गायकवाड, डॉ. रोहित गायकवाड, निकिता गायकवाड, वैशालीताई लोंढे, रवी भालेराव, लखन सुरवसे, रवी सुरवसे यांची मदत मिळाली आहे. किंबहुना या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच हे कार्य सिद्धीस जाऊ शकले.