स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८वी जयंती उत्साहात साजरी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८वी जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : नगरीतील सावरकर स्मारकात आपल्या देशासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल साडेसत्तावीस वर्षे तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. मास्क घालून व सुरक्षित अंतर राखून भगव्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. भाजप नेते अॅड. भारतभाऊ चामे, डाॅ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, अमित रेड्डी, डाॅ.मधुसूदन चेरेकर, अॅड.दिलीप मावलगांवकर, मकरंद जोशी, अशोक गायकवाड, संजय अरसूडे, बापूराव शिरुरकर, गौरव चवंडा,संपन्न कुलकर्णी, सागर कुलकर्णी, सौ अंजली कुलकर्णी यांनी सावकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण केली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्यात आले. वंदे मातरम् ,भारतमाता की जय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो असा जयघोष करण्यात आला. यानिमित्त जीवक आरोग्य मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.आजचे रक्तदातेः विश्वास चाकूरकर, संतोष गुट्टे, मधुसूदन चेरेकर, दिलीप शास्त्री, भगवान केंद्रे, सागर कुलकर्णी, सौ अंजली कुलकर्णी, महेश मुळजकर, संपन्न कुलकर्णी, ओंकार जोशी. रक्तदानाचे वेळी जयोस्तुते,सागरास, प्रियकर हिंदुस्थान, सांत्वन या सावरकरांच्या कविता वाजवण्यात आल्या. रक्तदात्यांना सावरकरांची प्रतिमा भेट देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयासह इतर अनेक शासकीय कार्यालयातही सावरकरांना पुष्पहार व आदरांजली वाहण्यात आली.

About The Author