महात्मा फुले महाविद्यालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी

अहमदपूर ( गोविंद काळे) :
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते, कवी आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे म्हणाले की, ” स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देऊन सावरकरांनी भारतीय तरुणांपुढे देशभक्तीचा आदर्श निर्माण केला. तसेच आपल्या कवितेतून त्यांनी मातृभूमीविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा व्यक्त केली आहे.त्यांनी वैचारिक लेखनातून विज्ञानाचे वारंवार महत्त्व पटवून दिले” असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. नागराज मुळे यांनी केले; तर आभार प्रदर्शन डॉ. सतिश ससाणे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी कोवीड- १९ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते .

About The Author

error: Content is protected !!