जिल्ह्यांतील चार साखर कारखान्याना डिस्टीलरी प्रकल्पास २७६ कोटी रुपये कर्ज मंजूर
जिल्हा बँकेच्या वतीने संचालक मंडळाच्या झूम अँप द्वारे बैठकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घोषणा
लातूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत साखर कारखान्याच्या (आसवणी) डीस्टीलरी प्रकल्पा च्या उभारणीसाठी जिल्ह्यातील ४ साखर कारखान्यास लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने २७६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपरावजी देशमुख यांनी दिली शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची झूम अँप द्वारे बैठक घेण्यात आली बैठकीत प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी देण्यात आली असून यामुळे साखर कारखान्यास ऊस गाळपा व्यतिरिक्त इतरही जोडधंदा करण्यासाठी मदत होणार असून त्यामूळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते.
यावेळी ग्रामीण भागातील स्वमालकीच्या जागेत असणाऱ्या शाखेसाठी बांधकामास मंजूरी देण्यात आली असून त्यात जिल्ह्यातील सताळा, शिवणी (को) शहरातील गूळ मार्केट शाखेला बांधकामास मंजूरी देण्यात आली असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून सुशोभित शाखा होणार आहेत तसेच गतवर्षी बँकेची विक्रमी वसुली झाल्याबद्दल सन्माननीय संचालक मंडळांनी जिल्ह्यातील सोसायटीचे चेअरमन गटसचिव यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
बैठकीला जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, संचालक आमदार बाबासाहेब पाटील, संचालक एस आर देशमुख, नाथसिंह देशमुख, भगवानराव पाटील,संभाजीराव सुळ, एन आर पाटील, अँड प्रमोद जाधव, व्यंकटराव बिरादार, धर्मपाल देवशेट्टे,सुधाकर रूकमे, सौ स्वयं प्रभा पाटील, सौ शिवकन्या पिंपळे, यशवंतराव पाटील, संजय बोरा, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, विविध खाते प्रमूख बैठकीला उपस्थित होते.