दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 390
नवीन 181 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात आज 390 कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत तर आजपर्यंत जिल्ह्यातील 83945 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 181 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात आज 1313 आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आलेले आहेत. 100 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 2071 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 81 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88661 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2613 आहे. लातूर जिल्ह्यात आज 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले तर आजपर्यंत 2103 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83945 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 390 आहे.