दयानंद कला महाविद्यालयात वि.दा. सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या वतीने आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॅा.एस.पी.गायकवाड , व कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव यांनी स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन केले. विनायक दामोदर सावरकर यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांनी ब्रिटीश सत्तेविरोधात लढे उभे जुलमी राजवटी विरोधातील चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून विख्यात. सावरकरांचे शिक्षण भगूर, नाशिक, पुणे, आणि मुंबई येथे एल.एल.बी. पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. त्यांना वाचनाची खुप आवड होती विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले. तसेच 1857च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूवनियोजित संग्राम होता अशी सावरकांची धारणा होती. अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकारांची ठाम भूमिका होती. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे. सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ या कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. मुंबई येथे 1938 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुध्दी आणि लिपीशुध्दी ह्यांचे महत्व सांगितले. त्यांची प्रकृती 1966 मध्ये ढासाळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. असे प्रतिपादन प्रा. डॉ. नितीन डोके यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड, डॉ.नितीन डोके यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.एस. सुर्यवंशी , कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव, श्री. कुरे आर. डी , वरिष्ठ लिपीक श्री. व्यास एस.आर. लिपीक श्री. वशिष्ट कुलकर्णी, श्री. रामकिशन शिंदे, श्री. नंदकिशोर खंडेलवाल ,श्री. मुंढे संजय, श्री. मुगळे पी.व्ही., श्रीमती तोंडारे एस.एल. श्री. हरिप्रसाद प्रयाग श्री. सचिन वांगसकर, श्री. सुर्यवंशी तुकाराम, श्री. आदित्य उटगे आदि उपस्थित होते.