आव्हानांवर मात : दिवस रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे रुग्णांसह नातेवाइकांतून कौतुक

आव्हानांवर मात : दिवस रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे रुग्णांसह नातेवाइकांतून कौतुक

गंभीर १०५ पॉझिटिव्ह रुग्ण झाले बरे, डॉक्टरांचे जीव धोक्यात घालून कार्य.


अहमदपूर ( गोविंद काळे )येथील ग्रामीण रुग्णालयातील डीसीएससी
कोविड केअर सेंटरमध्ये अतिगंभीर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केला जात असून, दुसऱ्या लाटेत १०५ पॉझिटिव्ह रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतले आहेत. या गंभीर रुग्णांकडे विशेष लक्ष द्यावे लागत असल्यामुळे येथील डॉक्टर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अहमदपूर तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा विळखा वाढला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तर आरोग्य यंत्रणा हातबल होण्याची वेळ आली होती. एप्रिल महिन्यात रुग्ण वाढतच चालल्यामुळे यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात डीसीएससी सेंटरमध्ये गंभीर रुग्णांवर उपचारासाठी २० बेड कोरोना रुग्णांना साठी ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात डीसीएससी सेंटरमध्ये २० बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव असुन ३ बाययपॅप मशीन, १ व्हेन्टीलेटर
८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध आहे.येथे ऑक्सिजन कमी असणारे व्हेंटिलेटरची गरज असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.आतापर्यंत १०५ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत.


अहमदपूर रुग्णालयाच्या डीसीएससी कोविड केअर सेंटरमध्ये नोडल ऑफिसर म्हणून डॉ. जयप्रकाश केंद्रे व डॉ. धीरज देशमुख हे काम पाहत आहेत. डॉ. सुरजमल सिहांते, डॉ. नाथराव कराड, डॉ. अमृत चिवडे, डॉ. मणकर्णा पाटील, डॉ. तुषार पवार, डॉ.प्रमोद वट्टमवार ,
डॉ. मधुसूदन चेरेकर, डॉ.अंकिता कुलकर्णी ,डॉ.राजेश्वरी सोळंके, डॉ.सुमया शेख, डॉ.शुभांगी सुडे, डॉ. बाळासाहेब मुंडे, हे काम पाहत आहेत.या सर्वाना वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार हे मार्गदर्शन करत आहेत.


सध्या तीन जणांवर उपचार सुरू


ग्रामीण रुग्णालयातील डिसीएससी कोविड केअर सेंटर १० एप्रिल ला सुरू करण्यात आले.१० एप्रिल ते मे या कालावधीत अती गंभीर एकुण ११८ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले होते. यातील १०५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ जणांवर
ग्रामीण रुग्णालयातील डिसीएससी कोविड केअर सेंटर
मध्ये उपचार चालु असुन यातील तिन्ही रुग्णांच्या तब्येतीची सुधारणा झालेली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.


कर्मचाऱ्यांचेही योगदान


ग्रामीण रुग्णालयातील डीसीएससी सेंटर मध्ये गंभीर रुग्ण असल्यामुळे डॉक्टरांना या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. डीसीएच कार्यलयीन जवाबदारी अनिकेत काशीकर तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञन अजय देशमुख, गणेश सुर्यवंशी, बाबू पठान,गजानन पदातूरे
औषधे वितरणाची जबाबदारी सतीश पाटील, जियाऊल मुनसी तर एक्सरेची जवाबदारी शुभांगी खसे यांच्याकडे आहे.
परिसेविका सी. कातोरे पी.पी. पाटील , सुनील कुंटे , सुनिता पारधी, सुनीता राजे ,अनिता कांदे , कावेरी परतवाघ , वर्षा मुंडे , शुभांगी येरमे, अनिता ढाके , अंजली मिटकरी, शरद वाघमारे अंतेश्वर सिमेंटवाड, ज्योती गुळवे ,प्रतीक्षा वाघमारे, तसेच सेवक बसवराज लोहारे ,राम घोटमुकले ,विक्रम गायकवाड पवन पित्तलवाड, वामन चव्हाण ,शिवाजी पुरी यांनी अनेक गंभीर रुग्णांवर योग्य पध्दतीने उपचार करून त्यांचे प्राण वाचवले आहेत.


कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे काळजी घेत करताहेत डॉक्टर उपचार


ग्रामीण रुग्णालयातील डिसीएससी कोविड केअर सेंटरमधील उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी सांगितले येथील डॉक्टर
आम्हाला घरातील व्यक्ती प्रमाणे संभाळून घेत योग्य पद्धतीने उपचार करत आहेत. आम्ही लवकरच बरे होऊन घरी जाणार ही आशा निर्माण झाली आहे. अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांबद्दल सांगितले.


ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी रुग्णांची चांगल्या प्रमाणे उपचार करत आहेत.
जर कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
कोविड नियमांचे सर्वांनी पालन करावे, प्रशासनाचे प्रयत्न जनहितासाठीच आहे. प्रशासन शक्यतो सर्व उपाययोजना राबवत कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागल्यास आपणास कोरोनावर यश मिळवता येईल. कोविड नियमांचे सर्वांनी पालन करावे.
वैद्यकिय अधिक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार

About The Author