ढगेज् इंग्लिश अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ढगेज् इंग्लिश अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इंग्रजी विषयात 104 विद्यार्थ्यांनी घेतले 90 पेक्षा जास्त गुण

लातूर (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नवा विक्रम रचत घवघवीत यश संपादन केले आहे. इंग्रजी विषयांमध्ये 100 पैकी 97 मार्क घेत यशाचा विक्रम रचला आहे. तर इंग्रजी विषयात 90 पेक्षा अधिक मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 105 च्या वर आहे एवढेच नव्हे तर 85 मार्काच्या वर इंग्रजी विषयांमध्ये मार्क मिळवणारे 170 विद्यार्थी असून जवळ जवळ सर्वच विद्यार्थी हे विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. ढगेज् इंग्लिश अकॅडमीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अकॅडमीचे मार्गदर्शक प्राचार्य व्यंकटराव ढगे सर, प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दयानंद पाटील, परिमल शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्राचार्य बाबुराव जाधव, प्रा. सचिदानंद ढगे, प्रा. विवेकानंद ढगे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ढगेज् इंग्लिश अकॅडमीतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी बोलताना दयानंद पाटील म्हणाले की, ढगेज् इंग्लिश अकॅडमीने मागील 22 वर्षांपासून इंग्रजी विषयाचा चढता आलेख कायम ठेवत शेकडो विद्यार्थी घडवलेले आहेत. आजही या अकॅडमीने आपला दबदबा कायम ठेवत गुणवत्तेची परंपरा कायम राखत प्रचंड मोठे यशाचे शिखर गाठलेले आहे.

या यशाच्या पाठीमागे प्रा. सचिदानंद ढगे सर, प्रा. विवेकानंद ढगे सर यांचे मार्गदर्शन असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य बाबुराव जाधव सर यांनीही ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या उज्वल यशाच्या परंपरेचे कौतुक केले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकासह सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सचिदानंद ढगे, सूत्रसंचालन प्रा. संभाजी नवघरे, तर आभार प्रदर्शन प्रा.विवेकानंद ढगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंगळे सर, जीवनगे सर, अमर घोलप आदींनी परीश्रम घेतले.

About The Author