कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजचे सीईटी परीक्षेत उज्ज्वल यश

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी – सीईटी परीक्षेत येथील कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून ‘कॉक्सिट’ च्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजचे सीईटी परीक्षेत उज्ज्वल यश

या परीक्षेत महाविद्यालयातील आदित्य मंठाळकर याने ९१.२८ टक्के गुण घेतले आहेत. तो महाविद्यालयात सर्वप्रथम आला आहे. नंदिनी चेवले हिने ८६.०५ टक्के गुण घेतले आहेत. ऋतुजा काकडे हिने ८५.४७ टक्के गुण घेऊन ती तृतीय आली आहे.

महाविद्यालयातील झरीन शेख हिने ८४.८० टक्के, अक्षय सोनवणे याने ८३.८७ टक्के, ऐश्‍वर्या जोगदंड हिने ८२.४६ टक्के, सृष्टी पवार ८२.३६ टक्के, ओम देवडे, ७३.०२ टक्के गुण घेतले आहेत.

महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, उपाध्यक्ष एल. एम. पाटील, प्राचार्या तबस्सूम मोमीन, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, प्रबंधक संतोष कांबळे, अधीक्षक प्रदीप कावळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी केले आहे.

About The Author